शिरोळ / प्रतिनिधी
येथील शिवाजी चौकातील अरुणोदय हॉस्पिटलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबिरा मार्फत मोफत नाव नोंदणी व पहिली तपासणी , गर्भवती महिलांसाठी बाळांच्या ठोक्याची पाचशे रुपये ची पहिली तपासणी मध्ये 50% सवलत व सिजर च्या बिलामध्ये 25 टक्के सवलत देण्यात आली होती. यावेळी अनेक गरजू रुग्णांनी याचा लाभ घेतला . डॉक्टर अमृता कोरे व डॉक्टर ऋषिकेश कोरे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. सोनोग्राफी सुविधाही रुग्णांसाठी अत्यल्प खर्चामध्ये उपलब्ध करून देत आहोत, याचाही लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.