Spread the love

राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 20 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.23 टिएमसी पाणीसाठा असून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

पंचगंगा नदीवरील– शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व खडक कोगे.

कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कांटे.

हिरण्यकेशी नदीवरील– साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी.

घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानर्डे-सावर्डे व अडकूर .

वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली.

 कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, वेतवडे व मांडूकली.

 वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी व कोडोली.

 कडवी नदीवरील- भोसलेवाडी,कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.

 धामणी नदीवरील-  सुळे,

 तुळशी नदीवरील– बीड असे 53 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.17 टिएमसी, वारणा 19.07 टिएमसी, दूधगंगा 7.48 टिएमसी, कासारी 1.59 टिएमसी, कडवी 1.49 टिएमसी, कुंभी 1.72 टिएमसी, पाटगाव 1.87 टिएमसी, चिकोत्रा 0.53 टिएमसी, चित्री 0.63 टिएमसी, जंगमहट्टी 0.46 टिएमसी, घटप्रभा 1.56 टिएमसी, जांबरे 0.82 टिएमसी , आंबेओहोळ 0.46 टिएमसी, कोदे (ल.पा) 0.21 टिएमसी असा आहे.

     

बंधाऱ्यांचीपातळी
राजाराम 31.6 फूट
सुर्वे 29.6 फूट
रुई 58.6 फूट
इचलकरंजी 54.6 फूट
तेरवाड 44.3 फूट
शिरोळ 36 फूट
नृसिंहवाडी 28.9 फूट
राजापूर 23.2 फूट
बंधाऱ्यांची पाणी पातळी

नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 12.6 फूट व अंकली 16.2  फूट अशी आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 104.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे
हातकणंगले- 17.2 मिमी
शिरोळ -19.1 मिमी,
पन्हाळा- 51.2 मिमी
शाहूवाडी-65.8  मिमी
राधानगरी- 46.5 मिमी
गगनबावडा-104.7 मिमी
करवीर- 34.2 मिमी
कागल- 23.3 मिमी
गडहिंग्लज-15.7 मिमी
भुदरगड- 46.7 मिमी
आजरा- 28.4  मिमी
चंदगड- 48  मिमी