इचलकरंजी
कोरोची परिसरामध्ये अनेक बेकायदेशीर जागा खरेदी झाल्याची माहिती उघडकीस येत असून येणाऱ्या काळात अधिक माहिती स्पष्ट झाल्यानंतर कोरोची परिसरातील अनेक मोठे मासे गळाला लागणार असल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील व्हाईट कॉलरचे अनेक गुंड वावरत असून यांनी अनेक सामान्य नागरिकांना दहशत दाखवून या परिसरातील प्लॉट नाममात्र खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. बोगस आधार कार्ड तयार करून बोगस व्यक्तीला उभे करून अनेक जागा हडपल्याचे प्रकरण पुढे येणार आहे. एकंदरीत कोरोची, कबनूर, यड्राव परिसरात असे अनेक बेकायदेशीर प्लॉट खरेदीचे प्रकरण झाल्याची माहिती समोर येत आहे. येणाऱ्या काळात हे सर्व प्रकरणे पुराव्यानिशी उघड होणार असून व्हाईट कॉलर पुढाऱ्यांचा धंद्याचा पडदा फास होण्याची चित्र आहे.