Spread the love

प्रवास होणार सुलभ, वेळेची होणार बचत, गुरुदत्त चे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या प्रयत्नाला यश.

नामदार मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून यापूर्वी शिरोळ तालुक्यातील ग्रामीण मार्गाचे ३ प्रमुख जिल्हा मार्गात (एमडीआर) दर्जोन्नती झाली आहे. यामध्ये प्रजिमा – ९२ मजरेवाडी पेट्रोलपंप – टाकळीवाडी ते घोसरवाड नदी पाणवठा , प्रजिमा – १०३ कवठेगुलंद, आलास, अकिवाट ते टाकळी, प्रजिमा – १०४ घोसरवाड, हेरवाड, मजरेवाडी ते कुरूंदवाड या प्र.जि.मा चा समावेश आहे. नव्या प्रजिमा -१२३ मुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचे दळणवळण व शेतमालाची वहातुक जलद व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

मा. माधवराव घाटगे
( चेअरमन व कार्यकारी संचालक – श्री गुरुदत्त शुगर्स )

शिरोळ तालुक्यातील उदयोगधंद्यासाठी व पर्यटण विकासासाठी चांगल्या व दर्जदार रस्त्यासाठी तालुक्यातील काही ग्रामीण मार्गाचे जिल्हा मार्गात रूपांतर होण्याची आवश्यकता होती. गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी त्याची दखल घेत चिंचवाड ते खिद्रापूर या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाचे रूपांतर प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक -१२३ मध्ये दर्जोन्नती करण्याच्या प्रयत्नाला यश मिळाले. श्री. घाटगे यांच्या प्रयत्नातून शिरोळ तालुक्यातील हाळ चिंचवाड, चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड , बस्तवाड मार्ग खिद्रापूर या ३० किलोमीटर रस्त्यांचे ग्रामीण मार्गातून नविन प्रमुख जिल्हा मार्ग – १२३ दर्जोन्नती मिळाली आहे. त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांनी जीआर काढून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती झाली आहे. या रस्त्याला दर्जोन्नती करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोउद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे श्री. घाटगे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले , शिरोळ तालुक्यातील ऊस हंगाम सुरु झालेनंतर व इतर वेळी रस्त्यावरील होणारी वाहणाची वर्दळ , अवजड व इतर वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांचा होणार वापर व रस्त्याच्या कडेला असणारी गावांची वाढलेला लोकसंख्या संख्या लक्षात घेता मोठ्या रस्त्यांची गरज होती. तालुक्यात नृसिंहवाडी, खिद्रापूर या धार्मिक स्थळांना दरवर्षों हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे मोठ्या व चांगल्या रस्त्यांची तालुक्याला गरज होती. चिंचवाड ते खिद्रापूर मार्ग क्रमांक -१२३ या नविन प्रमुख जिल्हा मार्गमुळे दळणवळण सुलभ होऊन शेती व अन्य सामग्रीची वहातूक चांगली होणार आहे. तसेच वेळेची बचत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.