मुंबई,2 जुलै
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. या राजकीय भूकंपात राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 30 आमदार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडवून आणला असून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह 30 आमदारांचा गळा घोटला आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली : राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला असून 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्यासह अमोल मिटकरी छगन भुजबळ यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार असून नऊ आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच राजभवनात शपथविधी सोहळा होणार असून अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री म्हणून नामनिर्देशित केले, त्यामुळे राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील का, हा नवा प्रश्न आहे. मुंबई राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे. आज राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात – अजित पवार यांच्या निवासस्थानी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, धनंजय मुंडे,आमदार किरण लहामाटे, दौलत दरोडा,आदिती तटकरे अतुल बेनके, रामराजे निंबाळकर पोहोचले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला नसल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद अजित पवारांना बहाल केले तर, 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळू शकते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यानंतर यशाचे श्रेय सगळे अजित पवारांना जाईल. नकळतच ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पदावर अजित पवार यांचा डोळा असल्याचे बोलले जात आहे.