Spread the love
  • धैर्यशिल मानेंच्या गोटात अस्वस्थता
  • जा मुंबईला घे बैठका
  • भाजपच्या पदरात जिल्ह्यातील एक तरी जागा मिळालीच पाहिजे
  • रेल्वे उड्डाण पुलाच्या मागणीत शेट्टींचं योगदान


भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भर पत्रकार परिषदेत राजू शेट्टी खोटं बोलत नाहीत असं म्हटलं. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. त्यातली एक जागा कमळावर लढवली गेली पाहिजे. आणि तशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे. असं सांगतानाच दोन्ही जागा जर कमळावर लढण्याचं निश्‍चित झालं तर काहीच प्रश्‍न उद्भवणार नाही. पण भाजपच्या पदरात जिल्ह्यातील एक तरी जागा मिळालीच पाहिजे त्यामुळे समतोल राहील असं थेट विधान करत माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे पुलाचं उद्घाटन हे खूपच आततायीपणानं झालं. मी स्वत: साक्षीदार आहे. राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेवून रेल्वे उड्डाण पुलाची मागणी केली होती त्यात त्यांचं योगदान आहे ते मान्य करावचं लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन या पुलाचं उद्घाटन केलं असताना मग आततायीपणा केलाच कशाला असा सवाल करत राजू शेट्टींच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी एक जागा कमळावर लढली पाहीजे असं आग्रह धरणं आणि राजू शेट्टी यांचं कौतुक करणं यामुळे भाजप आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना गृहीत धरून लोक संपर्कापासून दूर जावून मुंबईतल्यातच केवळ बैठकीत रंगणार्‍या खासदार धैर्यशिल माने यांच्या गोटात मात्र निपचिप आणि अस्वस्थता दिसून येत आहे. करोडोच्या कामाची विधानं करणार्‍या शिंदे गटाला लोक आपल्या सोबत सहजरित्या येतील हा अर्विभाव बाकी हाळवणकर यांच्या विधानाला गळून पडल्याची चर्चा आहे. लोकंाच्यापेक्षा खासदार धैर्यशिल माने यांना वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका आणि मुंबई, पुण्यातल्या बैठका आवडतात. त्यांच्या पदरात राजू शेट्टींच्या कौतुकाची फुलं पडत आहेत अशी चर्चा आहे.