मुंबई,2 जून
गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन 40 आमदारांसोबत बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. या मोठ्या घडामोडीनंतर आज पुन्हा राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आश्रम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समानेश आहे.