Spread the love

मुलांना इतिहास समजून सांगावा, आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन


मुंबई 12 जून
पुरोगामी कोल्हापूरला कलंक लावलेला जातीय तणाव निवळला असतानाच कागलमध्येही आक्षेपार्ह पोस्ट आढळून तणाव निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करत पोस्ट करणाèयाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचबरोबर कागलमधील चौकाचौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी कामगार मंत्री कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमधील परिस्थितीवरून औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणाèयांना कडक शब्दांमध्ये फटकारले आहे. औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुस्लिम समाजातील कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, औरंगजेबचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही. मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यांना इतिहास समजून सांगणे गरजेचे आहे. कोल्हापूरमधील झालेली दंगल गुप्तचर यंत्रणेतील अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमधील वातावरण बिघडत आहे. शिवरायांना मुसलमानांबद्दल कधीच आकस नव्हता. 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लिम होते. तर मावळे मुस्लिम किती असतील. त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. काल सुद्धा पोलिसांनी कागल मधील संबंधित मुलाला ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
कागलमध्ये काय घडले?
कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस लावल्याचे व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह काही आक्रमक तरुणांनी कागल पोलीस ठाण्याकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. जमावाला परत जाण्यास सांगताना संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी यांनी दोन्ही समाजातील लोकांसह व्यापाèयांना बोलावून बैठक घेत बंद न करण्याचे आवाहन केले. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही या बैठकीत दिली.
वादग्रस्त स्टेटसचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर कागल शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास खर्डेकर चौकात एकत्र आले आणि कारवाई करण्याची मागणी केली. खर्डेकर चौकानंतर गैबी चौकामध्येही तरुण एकत्र आले. त्यामुळे पोलिसांकडून रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी स्टेटस व्हायरल करणाèयांचे जबाब नोंदवून घेतले.