Spread the love


रत्नागिरी 12 जून (पीएसआय)
सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. समुद्राला उधाण आले असून अजस्त्र लाटांनी कोकणातील समुद्रकिनारी दाणादाण उडाली आहे. यामुळे समुद्र शांत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना बीचवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दुसरीकडे गणपतीपुळ्यात समुद्राला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाèयाला भरतीचा फटका बसला. समुद्राच्या लाटा किनाèयावर धडकल्याने छोट्या दुकानदारांना फटका बसला. अजस्त्र लाटांनी गणपतीपुळे समुद्रकिनारी दाणादाण उडवली आहे.
‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनाèयावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मोसमी पाऊस रविवारी कोकणात दाखल झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वारे दाखल झाले असून पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे हलक्या सरींचा शिडकावा झाला. किनारपट्टीवर ढगांची दाटी असून, वाèयांचा वेगही वाढला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वाèयांनी आगेकूच केली आहे. कर्नाटकातील शिवमोगा, हसनपर्यंत आणि केरळमधील श्रीहरीकोटा, तमिळनाडूतील धर्मपुरी, आसाममधील धुब्रीपर्यंत मोसमी वाèयांनी मुसंडी मारली आहे. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस 7 जूनला दाखल होतो. यंदा तो पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. केरळमध्येच तो उशिराने म्हणजे 7 जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते.
राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा वाहून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळ यापूर्वी ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. पण, आता चक्रीवादळाने दिशा बदलली आहे. अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले ‘बिपरजॉय’ गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. गुरुवारी, पंधरा जून रोजी दुपारी चक्रीवादळ कच्छ आणि कराची दरम्यानच्या किनाèयावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ कच्छच्या वायव्येस अरबी समुद्रात 610 किलोमीटर आहे.
दरम्यान, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पुढील 48 तास पोषक वातावरण आहे. दोन दिवसांत संपूर्ण तळकोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांत मोसमी वाèयांची आगेकूच सुरू राहील, असा अंदाज आहे.