Spread the love


मुंबई,12 जून
कागलमधील श्री लक्ष्मी देवी मंदिराच्या कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ रंगून गेले. हजारो माता-भगिनी डोक्यावर आंबील-घुगèयांच्या घागरी घेऊन या दिंडीमध्ये सहभागी झाल्या. मुश्रीफ यांनीही गळ्यात वीणा घेत हरी नामाचा गजर केला. मंदिराची बुधवारी वास्तुशांती होत आहे. त्यानिमित्त मंदिरावर प्रतिष्ठापना करावयाच्या कलशांची दिंडीने मिरवणूक काढण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या निधीतून मंदिराच्या भक्त निवासासह प्रदक्षिणा मंडप, दगडी पायèया व परिसर सुशोभीकरण हे काम पूर्ण झालं आहे. मुश्रीफ यांनी मिरवणुकीतील कलशांचे पूजन झाले. यावेळी बोलताना त्यांनी कागल ही राजर्षी शाहू महाराजांच्या सर्वधर्मसमभावाची भूमी असल्याचे सांगितले.
आपल्या लहान मुलांना इतिहास समजून सांगावा
दुसरीकडे, कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळून तणाव निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करत पोस्ट करणाèयाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याचबरोबर कागलमधील चौकाचौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणाèयांना कडक शब्दांमध्ये फटकारले. औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुस्लीम समाजातील कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना समजावून सांगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, ‘औरंगजेबचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही. मुस्लीम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांना इतिहास समजून सांगणं गरजेचं आहे.‘ कोल्हापूरमधील झालेली दंगल गुप्तचर यंत्रणेतील अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, ‘गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूरमधील वातावरण बिघडत आहे. शिवरायांना मुसलमानांबद्दल कधीच आकस नव्हता. 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लीम होते. तर मावळे मुस्लीम किती असतील. त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण होऊ शकत नाही.ठ काल सुद्धा पोलिसांनी कागल मधील संबंधित मुलाला ताब्यात घेतलं असल्याचे त्यांनी सांगितले.
कागलमध्ये काय घडलं?
कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस लावल्याचे व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह आक्रमक झालेल्या काही तरुणांनी कागल पोलीस ठाण्याकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. जमावाला परत जाण्यास सांगताना संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.