Group of people students with bags in school, back view. Meeting of young men and women before education. Vector
Spread the love

हातकंणगले / वार्ताहर ता. 3

येथील बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ या शाळेचा एस. एस .सी .बोर्ड परीक्षेचा निकाल 99.06 टक्के लागला आहे. यामध्ये सेमी माध्यमातून पहिले पाच गुणानुक्रमे कु. साक्षी महेश चौगुले(96.40 टक्के ), कु. शर्वरी संदीप मोरे(94.60 ), कु. प्रणाली संतोष पाटील,(94 ) आरती गोरख कदम व सौंदर्या राहुल वाणी( 92 ) ग्रंथाली विनोद कदम (89.80) यांनी सुयश मिळवले. मराठी माध्यमातून गुणानुक्रमे तेजस प्रमोद परीट (89 ) टक्के, कर्तिक आप्पासो खोत (88.20 ) कार्तिक भिमराव पालके( 85.80 ) टक्के गुण मिळवून सुयश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष, संचालक, सर्व पदाधिकारी शालेय समितीचे चेअरमन, सर्व सदस्य, आजी-माजी मुख्याध्यापक, अध्यापक शिक्षक यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.