Spread the love

हातकंणगले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आळते ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले. यामध्ये सर्व त्कृष्ट पुरस्कार सौ गीतांजली विनोद पाटील, याना देण्यात आला त्यानंतर सविता सुरेश पाटील, चांदबी रमजान मुजावर,जयश्री उत्तम नलवडे,सुवर्णा दिगबर भोसले,उमा अमोल कोळी यानाही देण्यात आला तसेच मुंबई पोलीस मध्ये नियुक्त झालेलं पल्लवी पाटील व समृद्धी गोरे यांनाही मानधन देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच अजिंक्य अरुणराव इंगवलेसो, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाणसो, उपसरपंच अमित पाटीलसो, पोलीस पाटीलसो, रियाज मुजावर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आळते गावातील श्रेष्ठ जेष्ठ प्रतिष्टीत मान्यवर व बचत गटाच्या अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.