Spread the love

आम. जयंत पाटील की प्रतिक पाटील? पण, तयारी सुरु



दूधगाव/महान कार्य वृत्तसेवा :
हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दुपारनंतर फिल्डींग टाईट करायला सुरुवात केली आहे.
आमदार जयंत पाटील किंवा प्रतिक पाटील हे युवा नेते मैदानात उतरतील, अशा दृष्टीने वाळवा, शिराळा आणि इस्लामपूर भागात बुथ बांधण्याच्या कामाला वेग आला आहे.
शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या विधानसभा मतदार संघात कुणी काम करायचे, हे मतदार संघ कुणी दत्तक घ्यायचे, 100 घरापाठीमागे बुथची रचना कशी असावी, 1 हजार मतदार 10 कार्यकर्ते आणि नेटके नियोजन याचा करेक्ट कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीकोनातून काय करता येईल या चाचपणीला जोर आला आहे.
ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची यादी जुळवाजुळव करणे, शाहूवाडी-पन्हाळ्यात ताकदीने उतरण्यासाठी काय करता येते ते पाहणे, शिरोळमध्ये नेमके कोण कोणाच्या संपर्कात आहेत याची माहिती घेणे आणि नवी फिल्डींग टाईट करत मतदार संघात परिवर्तन घडवायचे, अशा हिशोबाने राष्ट्रवादीने शनिवारी दुपारनंतर जोडण्या लावायला सुरुवात