Spread the love

पडक्या विहिरीत पडलेल्या व्यक्तीला महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत जीवनदान दिले. बुधवारी सकाळी 9:30 वाजता बि जी पी मार्केट मागे पडक्या विहिरीमध्ये एक इसम 50 फूट खोल खाली पडलेली वर्दी फायर फायटर ला मिळाली माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन संजय कांबळे,फायर फायटर चे जवान गुडाप्पा थरथरे, अब्दुल मुल्लानी , नामदेव वडर, विठ्ठल कवठे शहापूर पोलिस ठाण्याचे ए पी आय अभिजित पाटील, शशीकांत डोने,ॲम्बुलन्स चालक ओमकार माच्छरे यांनी मदतकार्य राबवून विहिरीमध्ये पडलेली व्यक्ती  बबन नारायण पोळ वय 45 रा. तिरंगा कॉलनी गल्ली नंबर एक कबनूर या व्यक्तीला जीवदान देऊन पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले.