शिवाजीनगर पोलीसात सहा जणावर गुन्हा दाखल
गोपीकिशन हरिकिशन डागा रा. प्रकाश लाईट समोर इचलकरंजी हे सुत खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात १२ डिसेंबर 2022 पासून 9 जानेवारी 2023 अखेर पियुष टेक्सटाईल या फार्म मार्फत संशयित आरोपी पंकज पुष्पक अग्रवाल, पियुष पंकज अग्रवाल, मयूर पंकज अग्रवाल, प्रवीण पुष्पक अग्रवाल, पुष्पक अग्रवाल सर्व राहणार पियुष टेक्सटाईल व प्रितेश शहा, रेखा रोडलाईन राहणार इचलकरंजी यांनी वेळोवेळी फिर्यादी गोपीकिशन हरिकिशन डागा यांच्याकडून सूतमाल घेऊन सुरुवातीला सुत मालाचे पैसे वेळेवर दिले. त्यानंतर सूत मालाचे बिलापोटी एन इ एफ टी केले असल्याचे सांगून यु टी आर नंबर पाठवले. परंतु फिर्यादी डागा हे बँकेत जाऊन यु टी आर नंबर बाबत खात्री केली असता यु टी आर नंबर बनावट असल्याचे निदर्शनास आले. संशयित आरोपींनी बोगस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून डागा यांची १ कोटी ८७ लाख २ हजार १३३ रुपयाचे सूतमालाचे अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी डागा संशयित आरोपीच्या कडे पैसे मागण्यात गेले असता पैसे देण्यास संशयित आरोपींनी टाळाटाळ केली. जिवंत सोडणार नाही अशी धमकीही फिर्यादी डागा यास दिली. फिर्यादी डागा याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली असून प्रविन व पंकज अग्रवाल यांना ताब्यात घेतले असून सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत .