Spread the love

इलेक्ट्रीकल शाखेतून विद्यार्थ्यांचे यश : अदानी पॉवरसह इतर सेक्टरमध्ये संधी

यड्राव, ता.31 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील १० विद्यार्थ्यांची अदानी ग्रुप लिमिटेड या कंपनीत निवड झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रीकलच्या अभिजित पट्टेकरी, कल्याणी गोडसे, महमदनौमन शेख, मोइन मुजावर, निखिल शंभुशेटे, निकीता पवार, पल्लवी माणगावकर, रुचीता पडळकर, ऋतुजा एकाटे, तुषार पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कंपनीकडून विद्यार्थ्यांची ऑनलाईन असेसमेंट झाली. त्यानंतर एच.आर. पॅनेनकडून महाविद्यालयात टेक्निकल इंटरव्ह्यु, एचआर इंटरव्ह्यु घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
अदानी ग्रुप लि. हि देशातील अग्रेसर कंपनी आहे. कंपनी अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी विलमार अशा अनेक क्षेत्रात कंपनी कार्यरत असून एकून २३०० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत.
या कॅम्पससाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांकडून मॉक इंटरव्ह्यु घेतले. तसेच कंपनीनुसार टेस्ट सिरिज सोडवून घेतले. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. तसेच तृतीय वर्षापासूनच अॅप्टीट्युड ट्रेनिंग, कोडींग लँग्वेज स्कील, माजी विद्यार्थांकडून मार्गदर्शन घेतले जाते. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटरशीप असते. या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे, यांच्यासह, सर्व डिन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.