Spread the love

जयसिंगपूर-

इचलकरंजी येथे नव्याने मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन (एम.एच.-५१ ) कार्यालयामुळे शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून दर बुधवारी होणारा आरटीओ कॅम्प कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही अशी माहिती माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,

शिरोळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी उद्योजक, विद्यार्थी विद्यार्थिनी, शेतकरी कामगार यांच्यासह सर्वच घटकांना या आरटीओ कॅम्प मुळे परिवहन विभागाशी संबंधित कामे करणे सोयीचे होत आहे, या कॅम्पमधून परिवहन विभागाला चांगले उत्पन्न देखील प्राप्त होत आहे असे असताना इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले म्हणून शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर येथे दर बुधवारी होणारा आरटीओ कॅम्प बंद होणार नाही, तो बंद होऊ नये यासाठी आपण स्वतः लवकरच राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन जयसिंगपूर येथे सुरू असलेला आरटीओ कॅम्प बंद होऊ नये अशी आग्रही मागणी करणार असल्याचेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकात म्हटले आहे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, शिरोळ तालुका मोटार मालक चालक संघटना, तसेच शिरोळ तालुक्यातील जनतेच्या मागणीला राज्य शासनाच्या माध्यमातून न्याय दिला जाईल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हंटले आहे.