Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ मधील युवक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधून वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर आणि आर्मी मध्ये भरती होत आहेत ही शिरोळसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी केल.
         महाराष्ट्र पोलीस भरतीचा निकाल येताच शिरोळ मध्ये आनंदाचे वातावरण पसरले , कारण शिरोळ मधील अनेक युवकांची पोलीस दलात भरती झाल्याचे जाहीर झाले. गोडी विहीर तालीम मंडळ हे नेहमीच वेगळे उपक्रम हाती घेत असते, निकाल जाहीर होताच, युवकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विश्वास नंदीवाले, अतुल अवघडे, अक्षय लोंढे ,शुभम पल्ले, विक्रम जोरे ,प्रतीक नाईक ,अमर फडतारे याबरोबरच सामाजिक कार्यामध्ये डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल पत्रकार कलाकार दगडू माने यांचा देखील सत्कार करण्यात आला. याबरोबरच अभिजीत माने व महेश मोरे यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने, बाळासाहेब कोळी, नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख ,दादासो कोळी ,देवाप्पा पुजारी ,योगेश पिसाळ, शिवाजी कोळी ,भोपाळ कोळी ,बापूसौ गंगाधर आदिसह मंडळाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.