Spread the love

फसवणूक करणाऱ्या मुकादमांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना ऊसतोड मजूर पुरवठा करतो म्हणून ॲडव्हान्स पोटी मुकादम पैसे उचलतात. त्यानंतर वाहन मालकांची कशी फसवणूक केली जाते याची सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे वाहन मालक कर्जाच्या खाईत लोटले जात आहे. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. या प्रश्न आपणच पुढाकार घेऊन न्याय द्यावा अशी मागणी वाहन मालकांनी केल्यानंतर माजी खासदार शेट्टी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, जिल्हा पोलीस प्रमुखापासून मंत्रालयापर्यंत या प्रकरणाबाबत कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळेच वाहन मालकांकडून फसवणूक करणाऱ्या मुकादमांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.

माजी खासदार राजू शेट्टींचा पुढाकार

शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील ऊस वाहतूकदाराची किमान ५० कोटी रुपयांहून   अधिक  फसवणूक केल्याने ऊसतोड मजुरांच्या मुकादमांविरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या माध्यमातून याबाबत आवाज उठवल्याने वाहधारकाला दिलासा मिळाला आहे

शिरोळ तालुक्यातील ऊस वाहतूकदार वाहन मालकांना ऊसतोड मजूर पुरवठा करतो म्हणून ऊसतोड मजुरांच्या मुकादमांनु लाखो रुपये उचलले आहेत पण ऊस गाळप हंगामाच्या कालावधीत ऊसतोड मजुरांचा पुरवठा संबंधित मुकादमांनी वाहनधारकांना केले नाही यामुळे तालुक्यातील १५० हून अधिक वाहनधारकांची आर्थिक फसवणूक या मुकादमांनी केली आहे ऊसतोड मजूर न आल्याने गाळप हंगामात ऊस वाहतूक झाली नाही याचा फटका सुद्धा त्या वाहन मालकांना बसून सुमारे ५० कोटीहून अधिक रुपयाची फसवणूक संबंधित ऊस वाहतूक वाहन मालकांची झाली बँकांची कर्ज काढून ऊस वाहतूक हंगाम यशस्वीरित्या पूर्ण व्हावा यासाठी ऍडव्हान्स पोटी मुकादमांना पैसे दिले होते ते पैसेही नाहीत आणि ऊसतोड मजुरी नाहीत यामुळे वाहनधारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला ऍडव्हान्स पोटी घेतलेले पैसे परत मागण्यास गेले असता मुकादम उडवा उडवीची उत्तरे देऊन वाहन मालकांच्यावर चोरी अपहरण खंडणी सावकारी जबरी असे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत घरातील महिलांना पुढे करून वाहनधारकांची पिळवणूक करून पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वाहनधारकांच्यातून होत आहे

तालुक्यातील ऊस वाहतूकदार वाहनधारक बीड, सोलापूर ,

हिंगोली, सांगली, विजापूर यासह अन्य भागातील ऊसतोड मजुर पुरवठा करणारे मुकादमांना प्रत्येक वाहन मालकांच्याकडून १० लाखापासून ते ३५ लाखापर्यंत रक्कम ऍडव्हान्स पोटी वाहनधारकांच्या कडून घेतली आहे अशी रक्कम सुमारे ५० कोटीहून अधिक आहे यामुळे फसवणूक झालेली वाहन मालकांच्या मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे

याविषयी बोलताना शिरटीचे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी म्हणाले की गेल्या चार-पाच वर्षात ऊस वाहतूक वाहन मालकांनी कर्ज काढून व्यवसाय करण्यासाठी वाहन खरेदी केली ऊस गाळप हंगाम पूर्ण करण्यासाठी ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमांना ऍडव्हान्स पोटी लाखो रुपये दिले पण संबंधित मुकादमाने मजूर पुरवठा न केल्याने त्या वाहन मालकांना ऊस वाहतूक व्यवसाय करता आला नाही परिणामी कर्जाचा डोंगर वाढत गेला सध्या अशा वाहन मालकांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी फसवणूक करणाऱ्या मुकादमाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेच्या वतीने फसवणूक झालेल्या वाहन मालकांना एकत्रित करून सामुदायिक रित्या गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेऊन आज शिरोळ पोलीस ठाण्यात फसवणूक केलेल्या मुकादमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे

यावेळी संघटनेचे संदीप राजोबा दिग्विजय जगदाळे अनिल चौगुले विनोद पाटील सुनील पाटील विठ्ठल पाटील नेमगोंडा पाटील यांच्यासह सुमारे ५० हून अधिक वाहन मालक गुन्हे दाखल करण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्यात उपस्थित होते

दरम्यान पोलीस ठाण्यात प्रत्येक वाहन मालकांच्याकडून ज्या मुकादमाने फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते