Spread the love

येथील खंजिरे इंडस्ट्रियल,शहापूर परिसरात लोकांच्या मालमत्ता व साहित्यावर नजर ठेवून चोरीचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरत असताना चिन्या उर्फ राज संजय सूर्यवंशी वय 20 वर्ष रा. इंदिरा कॉलनी स्वामी अपार्टमेंट जवळ कबनूर तसेच सुरज रामतीर्थ सुतार वय 20 वर्ष राहणार साठे नगर, कबनूर हे आढळून आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व गणेशनगर खंजिरे इंडस्ट्रियल शहापूर परिसरात संशयस्पदरीत्या चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळून आले आहे. सुतार व सूर्यवंशी हे काही कामधंदा करत नसल्याने तसेच चोऱ्या करून आपली उपजीविका करीत असल्याचे खात्री झाल्याने त्यांचे वर्तनात सुधारणा व्हावी व गुन्हेगारी वृत्तीपासून परावृत्त व्हावे यासाठी त्यांच्यावर सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
शहापूर पोलिसांनी नागरिकांना आव्हान करत परिसरात ,आजूबाजूला कुणी संशयास्पद इसम अशा रीतीने चोरीच्या उद्देशाने व इतर वाईट हेतूने फिरत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे