Spread the love

दत्तवाड ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्य नूर काशीम काले यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरून त्यांचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाले होते.  रिक्त झालेल्या जागेवर  18 मे रोजी मतदान होते. ८ मे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी अकबर काशिम काले यांच्या एकमेव अर्ज राहिल्याने अकबर काले हे  बिनविरोध झाले आहेत.   19 मे रोजी निकाल असून काले हे बिनविरोध झाल्याची औपचारिकता बाकी आहे. प्रभाग क्रमांक तीन मध्ये अमित माने, शकील सय्यद, बाळ काटकर, सागर कोळी, दत्ता पवार, बिस्मिल्ला काले, प्रगती घोरपडे, युवराज घोरपडे व अकबर काले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आठ मे रोजी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अकबर काले वगळता सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अकबर काले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आहे. यामुळे जवळजवळ त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अकबर काले यांचे भाऊ नुर काले यांना तीन आपत्यप्रकरणी अपात्र व्हावे लागले होते. मात्र अकबर काले यांना पुन्हा संधी मिळाल्याने दत्तवाड येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मध्ये काले परिवारांचे वर्चस्व राहिले आहे.