Spread the love

काल शिरोळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकच आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
काल सायंकाळी अचानकच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानकच आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. प्रत्येकजण पावसाच्या बचावासाठी आसरा शोधत होता. मात्र श्री दत्त साखर कारखाना येथील ग्राउंडवर युवकांनी धो-धो पावसातच फुटबॉलचा आनंद घेतला. काही युवकांनी नाही तटत असं स्टेटसही आपल्या व्हॉटसअपवर ठेवला होता. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार शिरोळ