Spread the love










 गेल्या अनेक दिवसापासून मिरज-कुरूंदवाड रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 
अर्जुनवाड कॉर्नर ते मटण मार्केट येथे रस्त्याचे रूंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आपण पाहत असलेल्या या मार्गाची वाहतूक शिरोळ येथील जयभवानी चौकातून वळवण्यात आली आहे. जयभवानी चौकातून असलेली एकेरी वाहतूक सध्या दुहेरी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कुरूंदवाड, नृसिंहवाडीला जाण्यासाठी आणि कुरूंदवाड येथून जयसिंगपूर, सांगलीला जाण्यासाठी जयभवानी चौकातून असलेल्या वाहतूकीचा वापर करावा. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार शिरोळ