Spread the love

इंचलकरंजी
पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना , संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते , सिने अभिनेते व जेष्ठ पत्रकार दगडू माने यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय संघर्षनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोमवारी इचलकरंजी येथील हॉटेल भरते किचन सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघर्षनायक मीडियाचे प्रमुख संतोष आठवले होते,
प्रमुख पाहुणे व पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे , ॲड राहूलराज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना सन्मानचिन्ह , मानपत्र, कोल्हापुरी मानाचा फेटा देऊन राष्ट्रीय संघर्षनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दगडू माने यांनी सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उपेक्षित , निराधार व दिव्यांग घटकासाठी आदर्शवत कार्य केले असून लोकसेवेसाठी त्यांनी संघर्ष अनुभवला आहे.सामाजिक कार्यातून सर्वसामान्य, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. फुले -शाहू – डॉ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी समाजाप्रती केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय संघर्षनायक हा पुरस्कार देऊन श्री माने यांचा गौरव करण्यात आला.
या समारंभास दयावान सरकार ग्रुपचे प्रमुख संदिपभाई निकुंभ ,पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार , संघर्षनायक मीडियाचे व्यवस्थापक समीर विजापूरे , ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान ,सचिन कमलाकर, चंद्रकांत भाट, आनंदा शिंगे, विकास गायकवाड, रवींद्र कांबळे, समीर विजापुरे, त्र्यंबक दातार आदी मान्यवर उपस्थित होते.