Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी
आज शिरोळ मध्ये अचानकच वादळीवारासह विजेच्या कडकडात पाऊस पडला. अचानकच पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांसह नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वाहनधारक निवाऱ्यासाठी इतरत्र पळताना दिसले. या पावसाचा मात्र चहा आणि वडापाव व्यवसायिकांना मोठा फायदा झालेला दिसला.

पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसापासून वातावरणात मोठा उष्मा जाणवत होता पावसामुळे वातावरणात थोडासा उष्मा कमी होईल अशी मते नागरिकांनी व्यक्त केली याबरोबरच के पी टी च्या पुढे सांगली पर्यंत मोठा पाऊस होता तर केपीटी च्या मागे प्रमाणात पाऊस पडल्याचे दिसून आले .