कृष्णा वारणा पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या काठावर असणाऱ्या या सुपीक भागाला उध्वस्त करू पाहणाऱ्या या महापुरावर कायमस्वरूपी उत्तर शोधू पाहणाऱ्या व संभाव्य महापूर रोखण्यासाठी शासनाने कोणती खबरदारी घ्यावी याचे विवेचन या दुसऱ्या पूर परिषदेच्या निमित्ताने केले जाणार आहे.
सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भूभागाला या महापूर आपत्तीतुन वाचवण्याच्या आमच्या प्रयत्नाला या भागातील जनतेने साथ देण्यासाठी कुरुंदवाड संगम घाटावर 1 जून रोजी होणाऱ्या पूर परिषदेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून साथ द्यावी असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.
1 जून रोजी होणाऱ्या पूर परिषदेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून साथ द्या – धनाजी चुडमुंगे
नृसिंहवाडी : कुरुंदवाड येथील संगम घाटावर येत्या 1 जून रोजी आंदोलन अंकुश च्या वतीने दुसऱ्या पूर परिषदेची पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली या पूर परिषदेला महापूर अभ्यासक व जल तज्ञ् श्री. प्रदीप पुरंदरे हे प्रमुख मार्गदर्शक लाभले असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी सांगितले.
नृसिंहवाडी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या पत्रकार बैठकीस कृष्णा पूर नियंत्रण कृती समितीचे सद्दश व निवृत्त पाठबंधारे अभियंता श्री विजय कुमार दिवाण व प्रभाकर केंगार म्हणाले की 2005 ते 2021 या 16 वर्षात कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात चार महापूर येऊन येथील मानवी जिवन मोठया प्रमाणात बाधित झाले तर नदी काठाची शेती उध्वस्त झाली होती.लागोपाठ येणाऱ्या महापुरावर शासनाने वेळीच उपाय शोधून महापुरावर नियंत्रण आणणे गरजेचे होते पण शासन तोकडी मदत देऊन आपली जबाबदारी टाळत आहे शासनाने उपाय योजना राबवाव्यात व याभागाला पुरापासून मुक्ती द्यावी यासाठी या पूर परिषदेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
2005 पासूनच कर्नाटकातील अलमट्टी धरणात 519:66 मीटर पाणी साठा करण्यास सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील या भागाला महापुराचा फटका बसू लागला हे वास्तव आहे.कर्नाटक सरकार ने अलमट्टी धरणाची उंची 522 मीटर पर्यंत वाढवण्याची तयारी चालवली आहे. 519:66 मीटर पाणी पातळी असताना 16 वर्षात हा भाग चार वेळा बुडला जर 522 मीटर ची पाणी पातळी केली तर दर वर्षी या भागाला बुडवून काढायचे कर्नाटक चे धोरण आहे.अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध व येथील जनतेच्या महापुराबाबत च्या भावना शासनाला समजाव्यात हा मुख्य उद्देश ठेऊन ही पूर परिषद आयोजित केली जाणार असल्याचे आंदोलन अंकुश व कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने या संयुक्त पत्रकार बैठकीत सांगितले.
या पत्रकार बैठकीला समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रदीप वायचळ संजय कोरे आंदोलन अंकुश चे राकेश जगदाळे उदय होगले दिपक पाटील रघुनाथ पाटील गुरुजी रशीद मुल्ला विकास शेसवरे अक्षय पाटील कृष्णा गावडे भूषण गंगावणे बाळासाहेब सोमण अप्पा कदम दत्तात्रय जगदाळे व आंदोलन अंकुश चे तालुक्यातील सद्दश उपस्थित होते.
महत्वाचे
2019 च्या महापुराची कारणे शोधण्यासाठी राज्य शासनाने वडनेरे समिती नेमली होती त्या समितीतील सद्दश असणारे श्री प्रदीप पुरंदरे हे या पूर परिषदेत महापुराची नेमकी कारणे काय आहेत त्यावर तातडीने उपाय कोणते केले पाहिजेत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव श्री दि.मा.मोरे, कोल्हापूर पाठबंधारे विभागात सध्या अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री महेश सुर्वे हेही महापुराबाबत आपले विचार मांडणार असल्याचे धनाजी चुडमुंगे व विजयकुमार दिवाण यांनी सांगितले.