सिटी रिपोर्टर/ महान कार्य वृत्त सेवा/इजाजखान पठाण
इचलकरंजी येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील शुभांगी वाटेगावकर, ॠुतूजा वडगे व पवन वर्मा या विद्यार्थ्यांनी प्रा.व्ही.बी. सुतार यांच्या मागदर्शनाखाली शेतक-यांचे दुग्धउत्पादन वाढीसाठी ‘एडव्हॉन्सड शेल्टरींग टेक्नॉलॉजी युजिंग टेक्नीकल टेक्स्टाईल ऍण्ड आय.ओ.टी.’हा अनोखा प्रकल्प विकसीत केलेला आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असून येथील बहुसंख्य नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर अधारीत दुग्धव्यवसाय हा शेतक-यांचा कणा असून या व्यवसायात शेतक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यापैकी उष्म हवामानामुळे दुग्धव्यवसायातील होणारी घट या समस्येला शेतक-यांना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस हवेतील उष्मा व तापमान वाढत आहे याचे प्रमुख कारण म्हणजे वाढते प्रदूषण व ग्लोबल वार्मिंग इफेक्ट.
या सर्व गोष्टींचा डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी विचार करुन व शेतक-यांची ही समस्या लक्षात घेवून जनावरांच्या गोठयामध्ये टेक्नीकल टेक्स्टाईल इन नॉनवोव्हन व आयओटी कार्यप्रणालीचा वापर करुण दुग्धउत्पादन वाढीसाठी प्रकल्प विकसीत केला आहे. याप्रकल्पामध्ये जनावरांना बाहेरील तापमानाचा त्रास होणार नाही यामुळे दुग्धउत्पादन वाढणार आहे. या प्रकल्पात वॉटर ऍटोमेशन सिस्टीमद्वारे नॉनवोव्हन कापड पूर्णपणे ओले ठेवले जाते जोपर्यंत गोठयातील तापमान कमी होत नाही तोपर्यंत हे कापड ओलेच राहते. त्यानंतर कापड भिजून शिल्लक राहीलेले पाणी हे पुन्हा रिसायकल करुण टाकीमध्ये साठवले जाते कि ज्यामुळे पाणी वाया जात नाही. तसेच आतील तापमान, आर्द्रता, खेळती हवा, टाकीतील पाण्याची पातळी, नॉन ओव्हन कपडयातील पाण्याचा ओलावा या सर्व गोष्टी इंटरनेटशी जोडल्यामुळे आपल्याला त्या कोठूनही पाहता तसेच कंट्रोल करता येतात.
डीकेटीईचे विद्यार्थी नेहमीच नाविन्यपूर्ण व समाजउपयोगी प्रकल्प विकसीत करीत असतात हा प्रकल्प देखील शेतक-यांचा हिताचा आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा.डॉ. सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील व आयडिया लॅबचे डॉ व्ही.डी. शिंदे यांचे विषेश सहकार्य लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईच्या इटीसी विभागातील विद्यार्थ्यांनी दुग्धउत्पादन वाढीसाठी तयार केलेल्या प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.