Spread the love

तारदाळ वार्ताहर / बसगोंडा कडेमणी
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर,संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे छ. राजश्री शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी झाली.या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पुजनाने करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा सर ,पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर तसेच पालक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.यानंतर छ.शाहू महाराज यांना 100 सेकंद स्तब्ध राहुन अभिवादन करण्यात आले.यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी छ.राजश्री शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली. तसेच मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी छ.राजश्री शाहू महाराज यांच्या जीवना विषयी थोडक्यात आपल्या मनोगतातुन माहिती सांगितली.
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी,पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.हेमगिरे एस.के. सर यांनी केले तर आभार श्री.कांबळे एस.एम. सर यांनी मानले