Spread the love

जयसिंगपूर शहर व परीसरात राजर्षी शाहु महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त जयसिंगपूर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी 100 सेकंद स्तब्ध राहुन आदरांजली वाहण्यात आली.

येथील क्रांती चौकातील राजर्षी शाहु महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळयाला शहरातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळाला अभिवादन व 100 सेकंद स्तब्ध राहुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.निता माने, मिलिंद शिंदे, माजी नगरसेवक सर्जेराव पवार, बजरंग खामकर, रघूनाथ देशिंगे, मिलिंद भिडे, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, सुभाष भोजणे, शिवाजी कांबळे, वासुदेश भोजणे, प्रमोद जाधव, अनिल तराळ यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

दरम्यान येथील शाहुनगर येथील आम्ही शाहुनगरकर या ग्रुपच्या वतीने 100 सेकंद स्तब्ध राहुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शंकर नाळे, शैलेश आडके, अ‍ॅड.धनजंय दळवी, बंडू उरुणकर, विजय नलवडे, सचिन मिसाळ, मिलन शिंगाडे, अक्षय बाबर यांच्यासह नागरीक उपस्थित होते.