Spread the love

तमदलगे : बहुजनांच्या उत्थाना करीता राजर्षि छ. शाहू महाराज यांनी समाजात समतेचा कट्टर आग्रह धरून शिक्षणाची गंगा राजवाडया पासून झोपडी पर्यंत नेऊन ज्ञानरूपी अमृत सामान्य जनांना पाजून सन्मानाने जगण्यासाठी सशक्त केले असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समारोप समारंभात संस्थेचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष समाजभूषण अनिल कांबळे-माणगांवकर होते ते आपल्या मनोगतात म्हणाले की, राजर्षि छ. शाहू महाराज यांनी राधानगरी तलाव, सर्व धर्म जातीची वेगवेगळी विद्यार्थी वस्तीगृहे, शिक्षण संस्था व विद्यार्थ्याना परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप आणि १९०२ साली नोकरीतील आरक्षण, रेल्वे, कृष्ठ रोग करीता दवाखाना, जनावरा करीता पांजरपोळ, शेतीमध्ये चहा मळे इत्यादी सर्वच घटका करीता कार्य करून करवीर संस्थानाचा आदर्श जगापुढे ठेवला.
प्रारंभी दलितमित्र डॉ. अशोकराव माने आणि समाजभूषण अनिल कांबळे यांच्या हस्ते राजर्षि छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ठिक सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्दता पाळून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक चिंतामणी निर्मळेसर, नानासाहेब राजमाने, जितेंद्र चोकाककर, प्रभारी कार्यलक्षी संचालक – दिलीप काळे, चिफअकौंटंट विवेक कुलकर्णी, स्वामी समर्थ महिला सूत गिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, नायकू माने, मोहसिन मुजावर, फारूक मुजावर, शेषगोंडा पाटील, विशाल बरमे, ,जगदीश जाधव, पंकज मगदूम, ओंकार रौंदे, प्रथमेश शिंदे, बळवंत खोंद्रे, प्रमोद भोसले सतिश राजमाने, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत जनरल मॅनेजर जी. आर. माने यांनी केले. आभार विनोद सुतार यांनी मानले.