कोथळीत आमदार चषक नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन संपन्न
कोथळी/ प्रतिनिधी
मोबाईल व टी.व्ही च्या जमान्यात आजही मातीतील व मैदानी खेळ जपले पाहिजे या उद्देशाने आज शासन स्तरावरून व सामाजिक संस्थेतून अनेक प्रयत्न चालू आहेत. अशा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोथळीतील हॉलीबॉल क्लब च्या वतीने काम केले जात आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. हे कार्य खरंच युवकांना प्रेरित करण्यासारखे असून त्यांच्या इतर गावातील तरुणांनी सुद्धा अनुकरण करून अशा स्पर्धा भरून येणाऱ्या पिढीला मातीशी नाळ जपले पाहिजे. असे मत कोथळी येथील हॉलीबॉल प्रीमियर लींक आमदार चषक या नाईट हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री, आम.डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी व्यक्त केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जयसिंगपूर मध्ये एक मोठे चांगले क्रीडा संकुलन उभा करून आज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मुलं खेळण्यासाठी येत आहेत. हे खऱ्या अर्थाने शारीरिक, मानसिक व आरोग्यासाठी फायदेशीर असून मातीतील खेळ जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज कोथळीचे ह्या पद्धतीने हॉलीबॉल खेळ इतर तालुक्यातील गावांनी सुद्धा भरवावे असे मी आवाहान करत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून आम.डॉ.राजेंद्र पाटील (यड्रावकर) उपस्थित होते.
यावेळी स्वागत महावीर बोरगावे यांनी तर प्रास्ताविक प्रकाश पुजारी यांनी केले.
यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत, दीप प्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमांमध्ये बारा संघ आपले टीम लावले असून सात दिवस हे सामना कोथळी गावात चालणार आहे. पंचक्रोशीतून नागरिक हे सामना पाहण्यासाठी येत आहेत.
यावेळी शिरोळ तालुका सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नादणे, माजी उपसभापती राजगोंडा पाटील, यड्राव बँकेचे व्हॉ. चेअरमन दिलीप मगदूम, सरपंच भरतेच खवाटे, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन ए. डी. शिरोटे, दिलीप पाटील (एम.डी), भरत इसरान्ना, क्रांती पतसंस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, विद्याधर कर्वे, अनिल बोरगावे,गोलू थबगोंडा, गौतम पाटील सह मोठ्या संख्येने नागरिक मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन जितेंद्र नादणे यांनी केले.
तर आभार अरजय शिरोटे यांनी मानले.