दतवाड येथे काही दिवसापूर्वी राजकारणात उदय झालेला दोन नंबर धंद्यामध्ये हात धरून जम बसवलेला बार मालकांनी चक्क सरकारी दवाखान्यात शेजारी बिअर बार परमिट रूम सुरू केले आहे . शेजारी असणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या भिंतीवर कोणाचीही परवानगी न घेता चक्क खाजगी बांधकाम केले आहे. यावेळी येथील दवाखान्याच्या इन्चार्ज डॉक्टर यांना विचारले असता मी सध्या रजेवर आहे. यामुळे या बांधकामाबाबत मला काहीही माहिती नाही अशी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. चक्क सरकारी मालमत्तेवरच खाजगी बांधकाम करून सरकारी यंत्रणेला आपल्या ताब्यात ठेवले आहे. एकंदरीत सध्या दतवाड मधून या ठिकाणी सुरू असलेला परमिट रूम बियर बार बंद व्हावे यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसात या बार विरोधात बार बंद व्हावे यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम हे सुरू झाल्याचे कळते