Spread the love

तारदाळ वार्ताहर / बसगोंडा कडेमणी

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
तारदाळ येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच बाबासो महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तारदाळकरांनी शंभर सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी प्रसाद खोबरे, रणजीत पवार, नितिन खोचरे , मृत्युंजय पाटील, सचिन पवार, भिमराव बन्ने, विजय चौगुले, भाऊसो चौगुले, श्रीकांत शिंदे, रमेश नर्मदे, सागर नाईक, सुधाकर कदम, संजय तिवडे, विकास बन्ने,यांच्यासह ग्रामस्थ उपस्तीत होते.