जलक्रांती, सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना 101 व्या स्मृति दिनानिमित शिरोळ मध्ये ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं.
सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी उपस्थिती लावली होती. याबरोबरच विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची वाटप करण्यात आले व बक्षिसाची थाप देण्यात आली
