इचलकरंजी शहरातील मोटरसायकल चोरी रोखण्यासाठी तसेच चेन स्नॅचिंग ला आळा घालण्यासाठी इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे वतीने विना नंबर प्लेट फिरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात विना नंबर प्लेट वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढत आहे.त्याचबरोबर वाहतूक नियम भंग केल्यानंतर दंड चुकवण्यासाठी अनेक वाहन चालक विना नंबर प्लेट वाहन चालवत असतात अशा चुकार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.आज दिवसभरात जवळपास विना नंबर प्लेट फिरणाऱ्या जवळपास100 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 50 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
या प्रकारची कारवाई ही यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक शाखेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण कांबळे,पोलीस हवालदार गुरुनाथ चव्हाण, प्रदीप कोळी ,प्रमोद आंबी, सुरेश कांबळे ,विश्वनाथ बागडे यांच्या पथकाने केली.