मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांनी दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा :विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा
माजी आरोग्य राज्यमंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर त्यांच्या वाढदिनी सहकार, समाजकारण, राजकारण, साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला, शिरोळ हातकणंगले परिसरातून मान्यवर लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सेवा सोसायट्या दूध संस्था, पतसंस्था बँका यांच्या संचालक मंडळाचे शिष्टमंडळ यांच्यासह व्यापारी व उद्योजक व इतर सर्वच क्षेत्रातील घटकांनी प्रत्यक्ष भेटून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या, सकाळी सात पासून जयसिंगपूर येथील गल्ली नंबर सहा येथील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती, तत्पूर्वी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पार्वती को-ऑपरेटिव इंडस्ट्रियल इस्टेट येथे असलेल्या स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन आण्णांच्या समाधीचे दर्शन घेतले,
जयसिंगपूर-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री संजय बनसोड, माजी मंत्री दत्तामामा भरणे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार अमल महाडिक, आमदार पी. एन. पाटील, आयपीएस अधिकारी विकास खर्गे, के एल इ चे प्रभाकर कोरे, राजू लाटकर, शिवसेनेचे संजय पवार, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, रजनीताई मगदूम, भूमाताच्या तृप्ती देसाई, बाबासाहेब पाटील आसुरलेकर, यांच्यासह अनेक मान्यवर आजी-माजी मंत्री खासदार आमदार यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नयनतारा ऑप्टिकल्सच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केले होते, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव येथे शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट व के एल ई हॉस्पिटल बेळगाव यांच्या विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन सकाळच्या सत्रात झाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आगर येथील 15 कोटी रुपये खर्चाच्या मागासवर्गीय मुलींसाठींच्या वसतिगृह बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संपन्न झाला, त्याचबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ येथे पद्माराजे हायस्कूल परिसरातील जय भवानी तरुण मंडळाचा चौक सुशोभीकरणाचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला,
त्याचबरोबर आमदार यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर आयोजित केलेल्या जयसिंगपूर प्रीमियम लीग या क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन सकाळच्या सत्रात माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले, सायंकाळच्या सुमारास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळी येथे कोथळी व्हॉलीबॉल प्रिमियर लीग आमदार चषक 2023 या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले,दिवसभरात शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती शुभेच्छा देणाऱ्यामध्ये आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार के. पी. पाटील, राहुल आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने (बापू)प्रकाश सातपुते, शामराव कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नानासो गाट, मदन कारंडे,ए. वाय. पाटील, विरेंद्र संजय मंडलिक यांच्यासह
शिरोळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, दत्त साखर कारखान्याचे, अनिलराव यादव, संजय कांबळे इचलकरंजी, संचालक रणजीत कदम, ऍडवोकेट प्रमोद पाटील, दरगू गावडे, आप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगांव सहकारी बँकेचे चेअरमन महादेव राजमाने, भुपाल खामकर,माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे, जवाहरचे संचालक बाबासाहेब पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे, प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाषसिंग रजपूत, विजयसिंह माने देशमुख, शिक्षक नेते खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख सतीश मलमे,अमरसिंह माने पाटील, प्रताप उर्फ बाबा पाटील, शिवाजीराव सांगले, जयसिंगपूर शहर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अमरसिंह निकम, कनवाडकर सरकार, उद्योजक बाळासाहेब भांदीगरे, आण्णासाहेब दानोळे, विश्वास बालीघाटे, अनिल बागणे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, कपिल भोसले, सागर कारंडे,दक्षिण भारत जैन सभेचे भालचंद्र पाटील, स्वदेशीचे रावसाहेब पाटील, दादासो सांगावे, रामचंद्र मोहिते, रमेश भुजगुडे, सुनील कुरुंदवाडे, कर्मवीर समूहाचे सागर चौगुले, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, दशरथ काळे, पैलवान केशव राऊत, भालचंद्र कागले, सुरेश शहापुरे, युवा उद्योजक संदीप घोडावत, गजाननराव सुलतानपूरे, मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिपती बाबर, महेश काकडे, विनोद चोरडिया, बाबूलाल मालु, पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी कुरडे, महेंद्र सावंत, प्रकाश झेले, संभाजी मोरे, राजेंद्र झेले, दादासाहेब पाटील चिंचवाडकर, असलम फरास, संजय पाटील कोथळीकर, शैलेश गाडे, बजरंग खामकर, सर्जेराव पवार, शितल गतारे, शंकरराव कलकुटगी, बाळासो वगरे, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, ऍडवोकेट संभाजीराजे नाईक, गजाधर मानधना, रजनीकांत कांबळे, श्रीमती प्रेमला मुरगुंडे, मिलिंद शिंदे, वासुदेव भोजणे, रघुनाथ देशिंगे, अमरदीप कांबळे, मुनीर शेख, समीर कुपवाडे, सांगलीचे माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, चंद्रकांत झेले, बबन हातळगे, यांच्यासह प्रांताधिकारी मौसमी चौगुले-बेर्डे, सहाय्यक निबंधक प्रेम राठोड, जयसिंगपूर भुमी लेख अधिकारी स्वप्नजा माळवदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी तैमूर मुलाणी, विविध सामाजिक संस्था व सहकारी संस्थांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले ज्यामध्ये स्टोन क्रशर असोसिएशन, इंजीनियरिंग आणि आर्किटेक्ट असोसिएशन, क्रीडाई, रोटरी क्लब, सिद्धराज देवालय ट्रस्ट, हमाल व गुमास्ता संघटना, नगरपालिका कर्मचारी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची झेले हायस्कूल स्कूल कमिटी, नाट्यशुभांगी जयसिंगपूर चे सर्व सदस्य, शिरोळ तालुका सैनिक फेडरेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटी, शिवाजी हाउसिंग सोसायटी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील घटकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन केले.