Spread the love

दत्तवाड / इजाजखान पठाण

दत्तवाड येथील सरकारी दवाखाना चौकातच व दवाखान्याच्या भिंतीला भिंत लागून व जवळच असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ राजकीय वजन असणाऱ्या व्यक्तीने या ठिकाणी बिअर बार परमिट रूम उघडत आहे. याचा त्रास शाळेतील मुलांच्या सह रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना होणार असल्याने या ठिकाणी होणारे परमिट रूम बियर बार होऊ नये अशी तक्रार येथील ग्रामस्थांमधून होत असल्याचे समजते. येतील सुज्ञ नागरिक कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कळते. एकंदरीत दतवाड येथील सरकारी दवाखाना चौकात इचलकरंजी, खिद्रापूर किंवा कर्नाटक कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लक्षणीय आहे. तसेच या ठिकाणी हॉटेल, दुकाने व फळांचे गाडे असल्याने महिला या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी परमिट रूम बियर बार झाल्यास मद्यपींचा त्रास होणार असल्याने या ठिकाणी होणारे परमिट रूम बियर बार होऊ नये अशी येथील ग्रामस्थांमधून चर्चा आहे.