इचलकरंजी शहरात शिवाजीनगर, गाव भाग व शहापूर अशी तीन पोलीस ठाणे आहेत. तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व अप्पर अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आहे. तशी इचलकरंजी ची ओळख वस्त्र नगरी बरोबरच क्राईम नगरी म्हणून पुढे येत आहे. मात्र अनेक दिवसापासून इचलकरंजी पोलिसांनी वाढत असलेल्या क्राईम रेट कमी करण्यात यश मिळवत असून, अनेक गुन्ह्यांचा उलगडा होत असल्याने, शहरातील पोलीस सध्या ॲक्टिव्ह मोडवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.