Spread the love


हेरले ता. हातकणंगले या ठिकाणी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे डिजिटल पोस्टर फाडल्या प्रकरणी याचे पडसाद जिल्हाभर उमटले होते याच प्रकरणी इचलकरंजी येथे मंगळवारी हिंदुत्ववादी संघटनांन अप्पर अधीक्षक पोलीस कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढला होता यावेळी आपण पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चातील संयोजकांनी मोर्चा संपला असे जाहीर केले होते.

यावेळी मोर्चातील काहीजण जनता चौकाकडे जात असताना केळ्याची व लिंबूचे हात गाडी या ठिकाणी दिसल्यानंतर हात गाडी उलटवण्यात आले होते याची प्रसाद मंगळवारी उमटल्यानंतर पोलिसांनी मोर्चातील 22 जणांवर इचलकरंजी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद केला आहे यामध्ये 1] शिवजी व्यास 2] प्रविण सामंत 3 ] सुजित कांबळे 4] बाळासाहेब ओझा, 5] अमित कुंभार (6] नागेश पाटील 7] प्रसाद जाधव 8] मंगेश मस्कर, 9]दिपक पाटील 10]पै. अमृत भोसले 11] अनिल डाळ्या 12] भाऊसो आवळे [3] मोहन मालवणकर, 14] संतोष सावंत 15] अरविंद माने, 16] मलकारी लवटे, 17 ] बंडा मुळीक, 18) रवि रजपुते 19) अनिकेत तानुगडे रा. चंदुर, 20] महेश कोरवी रा. साजणी 21] विशाल पोवार 22] सुशांत सदाशिव घोरपडे व इतर 20 ते 25 अनोळखी इसम यांचा समावेश आहे. याचा अधिक तपास पोसई भागवत मुळीक हे करीत आहेत.