इचलकरंजी येथील लेथ मशीन कारखानदार फिर्यादी सचिन संभाजी गायकवाड राहणार जवाहरनगर इचलकरंजी. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रुपेश गोरवाडे, बजरंग फातले, व अविनाश जर्मनी राहणार इचलकरंजी व इतर अनोळखी साथीदार हे 27 एप्रिल रोजी जवाहर नगर येथील स्वराज इंजिनिअरिंग या ठिकाणी फिर्यादी सचीन गायकवाड यास दम देऊन वीस हजार रुपये मोबाईल घेणेसाठी व चाळीस हजार रुपये रोख असे साठ हजार रुपये खंडणीच्या स्वरूपात पैशाची मागणी केली व फिर्यादीचा भाऊ अनिल व सुनील यांना शिवीगाळ केली व फिर्यादीचा भाऊ सुनील यास कानशिलात मारून कारखाना बंद पाडण्याची धमकी दिली. दिनांक पाच मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनी देशमुख हे करीत आहेत.
