Spread the love

चाचणी लेखा परिक्षणामुळे मोठे गैरव्यवहार समोर येणार आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सत्य हे सत्य असते. न्यायालयाच्या निर्णयाने दाखवून दिले आहे. असे शैमिका महाडिक यांनी म्हटले आहे.

सत्य हे सत्य असते


कोल्हापूर / इजाजखान पठाण / महानकार्य वृत्तसेवा
संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीवरुन गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. यामुळे धास्तावलेल्या सत्ताधार्‍यांनी लेखापरीक्षण थांबवावे, तसेच चौकशी करू नये यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावत सत्ताधार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे.
दरम्यान या निणर्यानंतर ताराबाई पार्कात मोठी गडबड उडाली होती. दरम्यान गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालाचे कामकाज सुरू ठेऊन शासनास अहवाल सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. चाचणी लेखापरिक्षणात गोकुळमधील मोठ्या भानगडी समोर येण्याची भिती व्यक्त झाल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुुरु होती. पुढील सुनावणीसाठी 8 जून रोजी होणार आहे. अशी माहिती संचालिका शैमिका महाडिक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *