कागवाड विधानसभा मतदार संघात भाजप पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे.विशेषता संबरगी गांवात भाजपाचे उमेदवार माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या धर्मपत्नी सौ.उज्वलाताई पाटील (माई) या प्रचारार्थ दाखल होताच मोठा संख्येने महिला वर्गानी भाजपाला पाठिंबा दर्शवित सहभाग घेत आपलं मत विकासाला हा नारा देत प्रचार केला.या प्रचारानने हा परिसर भाजपमय बनला होता.
सर्वांगीण विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या कागवाड मतदार संघात अल्पावधीत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून माजी मंत्री आ.श्रीमंत पाटील विकास कामे साधली आहेत.अशा प्रभावशाली कार्यतत्पर असलेल्या लोकनेत्याला प्रचंड मताधिक्य देत निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित महिला वर्गानी यावेळी केला
याबरोबर मतदार संघात भाजप पक्षाचा प्रचार जोर धरलाय आहे.या प्रचारात महिला वर्ग पुढाकार घेत असल्याने भाजपाला बळ आल्याचे दिसते..