हातकणंगलेकरांना पाणी आमदार सतेज पाटीलच देणार
जनात सुजान आहे : दीपक वाडकर यांचा पाणी योजनेवर श्रेय लाटणाऱ्यांना टोला
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)
हातकणंगले शहरासाठी 62 कोटींची पाणी योजना मंजूर केली म्हणून काहीजन निवडणुकीच्या तोंडावर गावात साखर पेढे वाटत आहेत. मात्र ही शहराची शुद्ध दिशाभूल आहे. योजनेला फक्त तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. प्रशासकीय नाही. किंवा निधी वर्ग झालेला नाही. ही वस्तुस्थीती आहे. पत्रकाच्या तारखेतही खाडाखोड आहे. विनाकारण सवंग लोकप्रीयता मिळवण्यासाठी हा खाटाटोप सुरु आहे. अशी खरमरीत टिका माजी उपसभापती आणि महाविकास आघाडीचे नेते दीपक वाडकर यांनी पत्रकातून केली आहे. तर ही योजना शहराचे आमदार आणि विधानपरिषदेचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील हेच पुर्णत्वास नेणार आहेत. असा ठाम दावाही वाडकर यांनी केला आहे.
हातकणंगले शहरासाठीची वारणा योजना कालबहाय्य झालेली आहे. गेली 5 ते 6 वर्षापासून लोक पाणी नियमीत मिळेल या अपेक्षेने प्रामाणीकपणे कर भरत आहेत. मात्र या बदल्यात त्यांना आठ ते दहा दिवसातून एक वेळ तेही अपुरे पाणी मिळत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यामातून आम्ही आमदार सतेज पाटील यांच्या मार्फत सातत्याने वारणा योजनेच्या बळकटीकरणासाठी पाठपुरावा करीत आहोत. मात्र याचं श्रेय निवडणुकीच्या तोंडावर काही जन घेत आहेत. हे शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल. वास्तवीक लोकसभा निवडणुकीत पाणी देण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र वर्षभरात काहीच हालचाली झालेल्या नव्हत्या. शहराचे आमदार म्हणून आमदार सतेज पाटील यांनी या कामात लक्ष घातल्यानंतर हालचाली गतीमान झाल्या. आणि फुकटात श्रेय घेण्याच्ाा काहींनी केविलवाना प्रय्ात्न सुरु केला. आणि शहरासाठी आपणच काहीतरी करत आहोत हे भासवले जात आहे. मात्र त्यांची यापूर्वीची कारकीर्द शहराने अनुभवली आहे. असेही शेवटी पत्रकात म्हटले आहे.
