Spread the love

गंगानगर/महान कार्य वृत्तसेवा
येथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कोल्हापुरातील सर्कीट बेंचमध्ये निर्णय झाला. या निर्णयात पी.एम.पाटील यांना दिलासा मिळाला. यानंतर कारखाना ते कबनूर चौकादरम्यानच्या शेडसमोर गुलाल उधळण्यात आला. फटक्यांती आतषबाजी करण्यात आली. एकमेकांना साखर भरवून आनंद साजरा करण्यात आला. परंतू तोंडातील साखर विरघळण्यापूर्वीच या निर्णयाला सर्कीट बेंचने 4 आठवड्यांची स्थगिती दिली. यामुळे या आनंदोत्सवावर विरजण लागलं.
गेल्या वर्षभरापासून पंचगंगा कारखान्याच्या निविरोध निवडीवर केंद्रीय सहकार प्राधिकरण व उच्चन्यायालय पातळीवर लढाई सुरु आहे. झालेली निवडणूक बेकायदेशीर आहे, असा आक्षेप रजनीताई मगदूम गटाने घेतला होता. याबाबत पी.एम.पाटील गटाच्या समर्थकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन गुरुवारी सायंकाळी अंतिम निर्णय झाला. झालेल्या बिनविरोध निवडीवर न्यायालयाने शिक्कामोर्त करुन पी.एम.पाटील यांना दिलासा दिला. पण काही अवधीतच या निर्णयाला स्थगिती देत रजनीताई मगदूम यांनाही दिलासा दिला. त्यामुळे दोन्ही गट या निर्णयामुळे समान अंतरावर असल्याचे स्पष्ट होते. आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात आम्ही निश्चितपणे जिंकू

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. परंतू न्यायालयाने आम्हांला सर्वाच्च न्यालयात दाद मागण्याची संधी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय रजनीताई गटाला मोठा दिला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही निश्चितपणे जिंकू.

  • अशोक पाटील,