पूर्वा असोसिएटच्या वतीने ‘दिवाली मिलन’ स्नेह मेळावा उत्साहात
इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा
पूर्वा असोसिएटच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही बिर्ला शक्ती व अल्ट्राटेक सिमेंटच्या विक्रेत्यांचा ‘दिवाली मिलन’ स्नेह मेळावा 2025 उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील तोष्णीवाल गार्डन येथे संपन्न या स्नेह मेळाव्यास कंपनीचे नॅशनल सेल्स हेड मुदस्सर शेख, रिजनल सेल्स हेड निशाद जोशी, ब्रँच हेड जयवंत लोखंडे, इचलकरंजी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय सातपुते व संस्थापक अध्यक्ष मुसा खलिफा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पूर्वा असोसिएटचे हर्षल धूत यांनी स्वागत केले. नितीन धूत यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला मुदस्सर शेख यांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच उच्चांकी विक्री होत आहे. यामध्ये सर्व विक्रेत्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगत कंपनीच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी विक्रेत्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विक्रेत्यांना दिवाळीनिमित्त भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास दीडशेहून अधिक विक्रेते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवानंद गुरव, ऋषिकेश हंडे, अमोद मकोटे, काशिलिंग मिठारी, जितेंद्र मगदूम, अभिनंदन बलवान, संकेत तारळेकर, शंकर गीते, मंथन उंदुरे, संदीप सारडा, किरण खोत, स्वप्निल चौगुले आदींनी परिश्रम घेतले.
