शिरोळ/प्रतिनिधी
येथील तहसिल कार्यालयातील पहिल्या मजल्यावर सोमवारी 13 ऑक्टोफ्लबर रोजी दुपारी 2 वाजता, पंचायत समितीतील 14 गणांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी अर्चाना नष्टे यांच्या अध्यस्थेखाली व तहसिलदार अनिलकुमार हेळकर,निवडणूक नायब तहसिलदार विनय कोलवकर यांच्या उपस्थित काढण्यात आले.
प्रथम अनुसुचित जाती साठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमकांनुसार कोथळी व अ.लाट साठी आरक्षित करण्यात आले. नंतर यामधुन चिट्या टाकण्यात आल्या. शालेय विद्यार्थी वंश गुरूप्रसाद सोहोनी व विद्यार्थींनी तृष्णा सागर पाटील यांच्या हस्ते चिट्टी काढण्यात आली. यामध्ये अनुसुचित जाती साठी कोथळी महिला मतदार संघ आरक्षित करण्यात आला. तर अ.लाट अनुसुचित जातीसाठी सर्वसाधारण आरक्षित राहिला. यानंतर शिल्लक राहिलेल्या 12 गणांमधुन ओ.बी.सी साठी चिट्टया काढण्यात आल्या. यामध्ये ओ.बी.सी साठी नांदणी,अकिवाट आणि अर्जुनवाड याच आरक्षण निश्चित झाल.
पंचायत समितीसाठी गण निहाय आरक्षण खालील प्रमाणे
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण शिरोळ
…………
सभापती सर्वसाधारण
………
जि.प : दानोळी – अनुसूचित जाती (महिला)
पंचायत समिती साठी
दानोळी – सर्वसाधारण महिला
कोथळी – अनुसूचित जाती /(SC ) महिला
………
जि.प उदगाव — नागरीकांचा मागास प्र वर्ग (OBC)
पंचायत समितीसाठी
उदगाव – सर्वसाधारण महिला
अर्जुनवाड — सर्वसाधारण महिला
………..
जि. प -आलास- सर्वसाधारण
पंचायत समितीसाठी
आलास- सर्वसाधारण
गणेशवाडी – सर्वसाधारण महिला
……….
जि.प : नांदणी – अनुसुचित जमाती (ST) महिला
पंचायत समितीसाठी
नांदणी – नागरीकांचा मागास प्र वर्ग महिला
चिपरी – सर्वसाधारण
…….
जि.प : यड्राव- नागरीकांचा मागास प्र वर्ग महिला (ओ.बी.सी )
पंचायत समितीसाठी
यड्राव-सर्वसाधारण
शिरढोण – सर्वसाधारण महिला
……….
जि. प : अब्दुललाट- अनुसुचित जाती महिला
पंचायत समितीसाठी
अब्दुललाट – अनुसुचित जाती सर्वसाधारण
अकिवाट – नागरीकांचा मागास प्र वर्ग सर्वसाधारण
………..
जि.प : दत्तवाड- महिला सर्वसाधारण
पंचायत समितीसाठी
दत्तवाड- सर्वसाधारण
टाकळी- सर्वसाधारण
……….
चौकट :
शासनाकडून ग्राम पंचायतीसाठी मिळणारा विविध वित्त आयोगातुननिधी हा थेट ग्राम पंचायतीला प्राप्त होत असल्यामुळे पंचायत समितीला मिळणारा निधी कमी झाला. याचा परिनाम आज पंचायत समिती आरक्षण सोडतीवर दिसुन आला. आरक्षण सोडती सभागृह अक्षरक्षा : उच्छुका विना ओस पडले. प्रशासकीय अधिकारी वगळता एका हाताच्या बोटावर मोजाता येण्या इतकेच इच्छूक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

