Spread the love

डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांना मदतीचा हात

विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेवून दैनंदीन खर्चास फाटा देवून दिला पूरग्रस्तांना आधार
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

  महाराष्ट्रातील मराठवाडा आणि सोलापूर जिल्हयामध्ये  आलेल्या महापुरामुळे तेथील नागरिक हे चिंताग्रस्त झाले असून आपले पशूधन घेवून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलेला आहे. सदर पूरकालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मदत करणे हे आदय कर्तव्य असुन त्यासाठी डीकेटीईच्या एनएसएस विभागाकडून पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्याची विनंती करण्यात आली आणि त्याला भरभरुन प्रतिसाद देखील प्राप्त झाला एका दिवसातच विद्यार्थ्यांनी जीवनाआवश्यक वस्तूंचे संकलन केले व हया सर्व वस्तू इचलकंरजीचे मदत संकलन केंद्र सेंटर नाईट कॉलेज यथे असल्याने तेथे पोहच करण्यात आली. त्या जीवनाअवश्यक वस्तू हया सोलापूर व मराठवाडयामधील सर्व पूरग्रस्त नागरिकांना देण्यात येणार आहेत.
डीकेटीईचा एनएसएस विभाग नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर असून, विद्यार्थी व स्टाफ यांनी पुरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने ही मदत गोळा केली आहे. डीकेटीईचे एनएसएस प्रमुख व सोशल डीन सचिन कानिटकर, मंजुनाथ रावळ, दिग्वीजय म्हामणे, संदीप कर्डिले, डॉ ए.ए.रायबागी, जितेंद्र मोळके, अभिजीत चौगुले, एस.के.पाटील एनएसएस विद्यार्थी समन्वयक स्वयंम जैन, अक्षिता भोसले, आनंद जाधव व आयुष देसाई यांनी सदर कामासाठी मोलाची भूमिका साकारली. या उपक्रमात आजी माजी विद्याथीर्र्, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.