खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा : 26.23 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर : आरोग्यमंत्रीही सकारात्मक
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे)
येथील इंदीरा गांधी सामान्य रूग्णालयात कार्डीयाक कॅथलॅब सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, यासाठी खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा सुरू असून, राज्य सरकारकडे 26 कोटी 23 लाख 20 हजार रूपये खर्चाचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. या प्रस्तावावर आरोग्य मंत्र्यांनी सुध्दा सकारात्मक मोहर उठविली आहे. ही लॅब सुरू झाल्यानंतर शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजीमधील रूग्णांवर ॲजिओग्राफी, ॲजिंओप्लॅस्टि सारखे महागडे उपचार अतिशय माफत दरात होणार आहेत. यामुळे कोल्हापूरच्या ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारने इंदिरा गांधी रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिल्यानंतर येथील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने अनेक सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या या रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. सुसज्ज इमारतीचेही नुतणीकरण झाले आहे. 300 बेडची सुविधा असलेले हे रूग्णालय लहान – मोठ्या शस्त्रक्रींयासह बाह्यरूग्ण, अतंररूग्णांना रूग्णसेवा दिली जाते. आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही, आहे त्या कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी आलेल्या रूग्णांना आरोग्य सेवा देण्याचा येथे प्रयत्न होत आहे.
आता या सुविधांमध्ये पुढील टप्पा म्हणजे कार्डीयाक कॅथलॅब हा आहे. लवकरच ही लॅब येथे सुरू होईल आणि ॲजिओग्राफी, ॲजिंओप्लॅस्टि आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांवर अत्यंत अल्प दरात उपचार होतील. कदाचित दिवाळीच्या दरम्यान या लॅबची गोड बातमी जनतेच्या कानावर येण्याची शक्यता आहे. ही लॅब पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी या कामगार आणि शेतकरी वर्गांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माफत दरात आरोग्य सेवा
सर्व सामान्य रूग्णांना अतिशय माफक दरामध्ये महागड्या आणि खर्चीक आरोग्यसेवा माफत दरात मिळाव्यात यासाठी माझे सातत्याने प्रयत्न आहेत. आता कार्डीयाक कॅथलॅब सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. याकरीता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हेही सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच या प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी मिळेले.
खासदार धैर्यशील माने, हातकणंगले लोकसभा मतदार संघ
