Spread the love

आ राहुल आवाडे यांचे विरोधकांना आव्हान
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व 65 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील आणि पहिला महापौर भाजपचाच होईल. त्यामुळे निवडणुक झाल्यानंतर मतचोरीचा आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीने आताच कच्च्या मतदार याद्या तपासून घ्याव्यात, असा खोचक टोला आमदार राहुल आवाडे यांनी लगावला.
भोनेमाळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आघाडीकडे विकासाचा कोणताच अजेंडा नसल्याने ते केवळ पाणी प्रश्‍नाचा बागलबुवा करत आहेत. पण आम्ही शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पंचगंगा योजनेच्या जलवाहिनी बदलाचे काम आणि 6 नवीन जलकुंभ
उभारणीनंतर शहरात अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरवासियांचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्‍न लवकरच भूतकाळात जमा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीकडे कामासाठी पळणार्‍या उमेदवारांची संख्या मोठी आहे. याउलट विरोधकाकडे सक्षम उमेदवारच नसल्याने एकाच घरात पती-पत्नी अशा दोघांना निवडणुकीस उभारण्याचा आग्रह केला जात आहे. युतीकडे इच्छुकांची गर्दी असली तरी निवडुन येण्याच्या मेरीटवरच उमेदवारी दिली जाणार आहे. परिणामी सर्व 65 जागांवर विजय मिळेल आणि महापौर भाजपचाच होईल. असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, अजितमामा जाधव, सुनिल पाटील, प्रकाश मोरे, मनोज साळुंखे, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते यांच्यासह नागरीक उपस्थित होते