दहा वर्षाच्या बालकाला लागण : ग्रामस्थ भितीच्या छायेखाली
यड्राव/महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे जीबीएस सिंड्रोमचा रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दहा वर्षाच्या बालकामध्ये याची लक्षणे दिसून आल्याने त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यातच पुन्हा जीबीएस सिंड्रोमने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त होत असून पालकांनीही तितकीच चांगली धास्ती घेतली आहे.
कोरोना नंतर अनेक गंभीर आजार समोर येत आहेत. नवनविन लक्षणांमुळे डॉक्टरांनाही निदान लागत नाही. त्यामुळे आजारांचा फैलाव वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी हातकणंगले येथील पुजारी या लहानग्या मुलीला एसएसपीई या असाध्य आणि जगभरात यावर औषध उपलब्ध नसल्ोल्या आजाराची लागण झाली. पालकाने चीनमधून काही औैषधे उपलब्ध केली. मात्र त्या चिमुरडीची जीवनयात्रा संपली. आठ महिन्यापूर्वी जयसिंगपूर येथील एका तरुणाला जीबीएस सिंड्रोमची लक्षणे दिसून आली. मात्र या आजारावर औषध नसल्याने उपचार झाले नाहीत. या घटना ताज्या असताना शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील एका बालकाला जीबीएस सिंड्रोमची लागण झाल्याचे उपचारादरम्यान दिसून आले. सध्या या मुलावर सांगली येथील खासगी इस्पितळात 17 सप्टेबर पासून उपचार सुरु आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबात विशेष लक्ष घातल तर बरे होईल अशी भावना कुटुंबियांची आहे.
जीबीएस सिंड्रोमची लक्षण
आशक्तपणा जाणवने, थांबून थांबून ताप येणे, मायात मुंग्या येणे आदी प्राथमीक लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.
